दख्खन महोत्सव 2025 हा यशस्वी सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रम असून, यामध्ये विविध क्षेत्रांतील उपक्रमांचे दर्शन होणार आहे. या महोत्सवाचे उद्दिष्ट समाजातील विविध घटकांना एकत्र आणून आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाला चालना देणे हे आहे. या महोत्सवात पुढील गोष्टींचा समावेश असेल:
स्थानिक उत्पादक, व्यावसायिक, आणि कलाकारांना प्रोत्साहन देणे.
पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उत्पादने जनतेसमोर आणणे.
सामाजिक एकात्मतेला चालना देत समाजाच्या प्रत्येक घटकाला एकत्र आणणे.