यशस्वी फाउंडेशन

यशस्वी आरोग्य योजना

उद्दिष्टे

“आरोग्यम्‌ धनसंपदा’ .खरंच आहे चांगले आरोग्य ही मोलाची संपत्ती आहे. या
संपत्तीचा ठेवा जपणं हा यशस्वीचा मानस आहे. त्याची पूर्ती करण्यासाठी यशस्वीने त्यांच्या सदस्यांच्या आरोग्यासाठी यशस्वी हेल्थ कार्ड’ ची योजना राबविली आहे. ह्या कार्डद्वारे हॉस्पिटलच्या अनेक विभागात उपचारांसाठी सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी विशेष सवलतीही यशस्वी फौंडेशनद्वारे देण्यात आल्या आहेत.जसे की, यशस्वी फौंडेशन महिला, पुरुष, तरुणवर्ग, बालक, जेष्ठ नागरीकांसाठी कार्यरत
आहे. 

सर्वांना आरोग्याचा चांगला ठेवा देण्यासाठी यशस्वी सदैव तत्पर राहिलं.आरोग्याच्या सुविधांसोबत आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे कामही यशस्वीतर्फे करण्यात येते आहे. जन-जागृतीसाठी “यशस्वी आरोग्य कार्यशाळेचे ‘आयोजन केले होते. त्याअंतर्गत “आहाराच्या योग्य सवयी व आरोग्य’ यांचे मार्गदर्शन डॉ. के. के. जाधव व डॉ. बोराखडे मॅडम यांनी दिले. त्याचबरोबर आयुर्वेद कॉलेजच्या वैद्यकीय विद्यार्थ्याकडून पथनाट्य सादर करून समाजामध्ये आरोग्यविषयक जागृती करण्यात आली.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तपेढीतील रक्ताची गरज ओळखून त्याची पूर्तता करण्याचे पवित्र कार्य यशस्वीनेरक्तदान शिबिराचे आयोजन करुन पार पाडले. सध्याचा बालक हा भविष्यातील भारताचा बळकट नागरीक होण्यासाठी,बालकाची रोगप्रतिकार शक्ती वृध्दीसाठी, निरोगी जीवनासाठी यशस्वी मार्फत त्याला सुवर्णप्राशन व बहुजीवनसत्व गोळ्या
उपलब्ध करुन टेण्यात आल्या.