यशस्वी फाउंडेशन

बांबवडे: मतिमंद मुले भेट

रोजगार मेळावा

सीमेवरच्या बंधूंसाठी आपुलकीचा धागा

आज १०९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियन येथे यशस्वी सोशल फाउंडेशनच्या सर्व महिलांनी आपल्या वीर जवानांसोबत रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला.
राखीचा हा नाजूक धागा फक्त प्रेम, विश्वास आणि जिव्हाळाचं प्रतीक नसून, तो आपल्या सीमावरील प्रत्येक जवानासाठी कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा संदेश घेऊन गेला.
 
मेजर सुभेदार संतोष सुकुंडे, सुभेदार उमेश वलगड्डी आणि सर्व जवानांसोबत हा सण साजरा करताना, आमच्या मनात एकच भावना होती – तुम्ही आहात म्हणूनच आपण आहोत.
 
यशस्वी फाऊंडेशनच्या सर्व महिला व मुलींनी बांधलेली ही राखी म्हणजे सीमावरील बंधूंसाठी असलेला आपुलकीचा आणि संरक्षणाचा शाश्वत धागा.