शेती हा देशातील सर्वात मोठा खाजगी क्षेत्रातील व्यवसाय आहे. देशातील ग्राहकांच्या बदलत्या आहारामुळे आणि उच्चमुल्यांकित प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे या उत्पादन व प्रक्रिया ही साखळी मजबूत करणे, शेतकरी उत्पादक गट, कृषी पदवीधर यांचा सहभाग वाढविणेस महत्व दिले आहे. कृषी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याच्या हेतूने कृषी उद्योजकांसाठी प्रशिक्षण व भेटी आयोजित करणे हे या योजनेचे प्रमख उद्देश आहेत.