यशस्वी महिला बचत गटाची चळवळ ही केवळ बचतीची चळवळ नसून ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. ‘गरीबाने गरीबीविरूद्ध चालविलेले युद्ध आहे’ आणि निर्भयतेने व स्वसामर्थ्यावर स्वत:चाआर्थिक व मानसिक विकास करण्यासाठी स्वत:शी केलेली बांधिलकी आहे. यशस्वीने चालविलेली ही चळवळ केवळ शासकीय धोरणातून निर्माण झालेली चळवळ नसून स्वेच्छेने स्विकारलेले सेवाव्रत आहे. यशस्वी महिला बचत गटाची संकल्पना जरी महिलांना आर्थिक सक्षम करण्याची असली तरी, यशस्वी बचत गट ही महिलांचा आर्थिक विकासच नव्हे तर सर्वांगीण विकासासाठी कटिबद्द आहे. यशस्वी बचतगटाच्या माध्यमातून आम्ही सर्व इच्छुक महिलांना एकत्र आणून त्यांच्याकरिता विविध व्यावसायिक प्रशिक्षणे उपलब्ध करून देत आहोत. “आर्थिक गुंतवणूक व बचत’ या विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून, त्यांना प्रशिक्षणाद्वारे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करीत आहोत.